गडचिरोली,) : खरीप पिकाची सुधारित पैसेवारी तहसिलदार यांचे कडून प्राप्त माहितीच्या आधारे संकलित करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2026-27 या वर्षाची खरीप पिकाची सुधारित पैसेवारी जाहिर करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरिप पिकाची गावे 1623 आहेत व एकूण पिका खालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरिप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गांवाची संख्या 04 आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीक नसलेली गांवे 54 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले 326 असून, 50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरिप पिक असलेल्या गावांची संख्या 1247 आहेत. अशा प्रकारे एकूण 1573 खरीप पिक असलेल्या गावाची सुधारित पैसेवारी जाहिर केलेली आहे.
सबब गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम 2026-27 या वर्षाची सुधारित पैसेवारी 0.63 आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.