AVB NEWS गडचिरोली :- गडचिरोलीची नक्षलग्रस्त व मागासलेला जिल्हा म्हणून ओळख पुसली जात असून हा जिल्हा राज्याच्या विकासात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी व्यक्त केला. जिल्हयातील खनिज संपत्तीच्या आधारे देशाचे प्रमुख स्टिल हब उभारण्याचा शासनाचा संकल्प असून त्यातून स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती होतील. औद्योगीक विकास करतांना जल, जंगल, जमिनीचे संरक्षण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि आदिवासी युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा भर असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.

खनिज बाधित क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी ४.९९ कोटींचे फिरते रुग्णालय

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना आरोग्यसेवा थेट त्यांच्या गावात उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. खनिज बाधित क्षेत्रातील नागरिकांना उपचारासाठी करावा लागणारा लांबचा प्रवास, वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून ४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (फिरते रुग्णालय) प्रकल्प राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले

 

Leave a comment